कांदलगाव – फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर ठाम असलेले तसेच समाजातील एकी टिकून ठेवण्यासाठी आधी समाजाचा नंतर स्वतःचा विचार करणारे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय कसा देता येईल यासाठी गांभीर्याने लक्ष देणारे, विचारधारेशी नेहमी प्रामाणिक काम करणारे, बहुजन नेते मा.विजय (नाना) सोनवणे यांचा 18 मे रोजी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रक्तदान शिबिर घेऊन तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो…दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तब्बल 83 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती जबाबदारी दाखवली…दिवसेंदिवस वाढते अपघात शस्त्रक्रिया, बाळंतपण, रक्तजन्य विकार व जन्मता बाळात आढळणारा थ्यालेसेमिया सारखा आजार यासाठी रक्ताची गरज अत्यंत असते.. हेच लक्षात घेऊन मा.विजय (नाना) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.आत्तापर्यंत हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
समाजकार्यात दोन्ही बंधू कार्यरत!
मा.विजय नाना सोनवणे आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. संजय नाना सोनवणे या दोन्ही बंधूंनी नेहमी विविध कार्यक्रमातून विविध उपक्रमाद्वारे समाजकार्य करत असतात.
वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात सर्वपक्षीय मान्यवर उपस्थिती!
या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षा चे संस्थापक अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.रवींद्र सरडे मा. विजय मामा शिद, सतीश चित्राव, वंचित बहुजन आघाडीचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष मा.राहुल चव्हान सर, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प.महाराष्ट्रा चे अध्यक्ष मा.संजय नाना सोनवणे, शहा गावचे उपसरपंच मा. दिलीप बापू पाटील, मा.विशाल दादा जगताप मा.गणेश बप्पा पाटील, मा.नागेश भाऊ पाटील,मा.मुन्नभाई नायकुडे, मा.राघुदादा कारंडे, प्रा.सीद्धार्थ चितारे सर, निखील भाऊ बगाडे, बहुजन मुक्ती पार्टी चे मा. सुरज धाईजे ,मा.विकास भोसले पुणे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.अनिल कडाळे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष मा.तुषार भोसले, मा.किशोर कडाळे मा.सागर शिंगाडे मा. अमजद शेख मा.विजय नाना सोनवणे मित्रपरीवार मोठ्या संख्येने उपस्थीत होते …!
