राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील पत्नी भाग्यश्री पाटील व भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता ताई पाटील ठाकरे हे श्रीक्षेत्र रांजणी देवाची तालुका माढा येथील श्री ओंकारनाथ भगवान लघु रुद्र अभिषेक सोहळा कार्यक्रमानिमित्त भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यकक्ष अमोलराजे इंगळे यांच्या सालाबाद प्रमाणे महाप्रसाद पंगतीच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी महापूजा आणि आरतीचा कार्यक्रम उरकल्यानंतर ते सहकुटुंब बसले असता अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे त्या ठिकाणी आले व शेजारी असलेल्या खुर्चीवर बसले, सतत आपल्या भाषणातून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करणारे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे हे एकाच ठिकाणी बसल्याने ते एकमेकांशी संवाद साधतील हा ग्रह मनात ठेवून लोक तिथे जमा झाले परंतु यांनी बोलणे तर सोडाच पण एकमेकांकडे बघितले देखील नाही या नाट्यामुळे लोकांची वरून एकी झाली तरी आतून मात्र नाराजीच आहे अशी चर्चा रंगली.
