विविध उपक्रमांतून इंदापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस साजरा

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार व कृतिशील नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राधिका रेसिडेन्सी क्लब इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल ४८० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र प्रमुखाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही स्वयंप्रेरणेतून रक्तदान करण्यास इथवर आलो आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी राधिका रेसिडेन्सी क्लब येथे आलेल्या रक्तदात्यांनी दिली.


यासह इंदापूर येथील श्रावण बाळ अनाथाश्रम शाळा या ठिकाणी देखील श्री प्रवीण माने यांनी गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे फळांचे व सोनाई दूध चे वाटप केले व येथे विद्यार्थ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केकही कापला तसेच माने यांनी तो सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून भरवला.

तसेच इंदापूर येथील श्री समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधिर निवासी शाळा येथेही माने यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दुधाचे वाटप केले. याविषयी आपले मत व्यक्त करताना ‘आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा हा उद्देश मनात बाळगून आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले’ असल्याचे प्रतिपादन यावेळी भाजपा नेते प्रविण माने यांनी केले.

‘‘महाराष्ट्र सेवक…’’ या समर्पित भावनेतून राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस हे जनतेशी असलेली आपली बांधीलकी जपत सातत्याने महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असल्याने प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्याकडे आकर्षित होत असतो, आणि यातूनच समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळत असते अशी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याच्या मनात असलेली भावना यावेळी माने यांनी बोलून दाखवली.

आजच्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने मयूर पाटील, आकाश कांबळे, मारुती वणवे, माऊली चवरे, बाबासाहेब चवरे, सदानंद शिरदाळे, गजानन वाकसे, तेजस देवकाते, राजकुमार जठार, किरण गाणबोटे, राम आसबे, तानाजी थोरात, नानासाहेब शेंडे, रमेश खारतोडे, अशोक वणवे, सचिन आरडे, माऊली वाघमोडे,सचिन सावंत,लखन जगताप,हर्षवर्धन कांबळे, बिभीषण लोखंडे, रविंद्र देवकर, अमोल मुळे, चांगदेव ढुके,रमेश पाटील, तानाजी मारकड, भारत बोंगाणे,रमेश पाटील, आप्पासाहेब गायकवाड, ऍड. मयूर शिंदे, सुधिर कोकाटे, शिवाजी देवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *