मयत जळालेला संपूर्ण परिसरात येतोय उग्र वास……
इंदापूर : नगरपालिका हद्दीतील अंबिका नगर येथील स्मशानभूमी ही अत्यंत भर वस्तीत आले आहे पाठीमागील जमीन ही सध्या लोक वस्तीचे इंदापूर शहरातील प्रमुख उपनगर झाले आहे. या उपनगराच्या बराबर पूर्वेला ही स्मशानभूमी असून एखाद्या नागरिकांची झालेली मयत व त्या मताचे जळालेला उग्र वास नागरिकांना त्रासाचा आणि आरोग्याला घातक असा विषय झाला आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी स्थलांतरित करण्याबाबत व मशानभूमीला आलेला निधी व कामकाज थांबवण्याबाबत शिवसेनेचे निवृत्त माजी सैनिक सोमवंशी यांनी नुकतेच इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना त्याबाबत निवेदन दिले आहे.

वास्तविक प्रकार असा आहे की इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीत अंबिका नगर येथे असणारी जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी ही बेकायदेशीर असल्याचा दावा सोमवंशी यांनी केला आहे इंदापूर नगरपरिषद हद्दीतील 4112 गट नंबर मधील वाद न्यायालयात चालू असल्याने त्याठिकाणी स्मशानभूमी बांधता येत नाही परंतु या स्मशानभूमीचे काम नुकतेच पुन्हा सुरू केले आहे या स्मशानभूमीमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निव्वळ गाव पुढार्यांच्या कामातील कमिशन साठी आणि ठेकेदारीसाठी हा हट्ट असल्याचे मेजर सोमवंशी यांनी त्यांच्या अर्जात नमूद केले आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, कृष्णाजी ताठे सर, सचिन शिरसट, मेजर रविराज पवार, डॉ माने साहेब, सुभाष डरंगे-पवार, नानासाहेब देवकर, ऍड. ऋषिकेश कोथमीरे, वासुदेव शिरसठ, अवधूत पाटील, मेजर गोरख कदम, बंडू शेवाळे, शकील कुरेशी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
याबाबत इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, नागरिकांनी स्मशानभूमीच्या कामाची मागणी केली म्हणून प्रस्तावित केले होते परंतु ही स्मशानभूमी लोकवस्तीत असल्याने याचा त्रास होत आहे असा स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत निवेदन दिले आहे, त्यामुळे जे नियमानुसार असेल तोच निर्णय घेतला जाईल असा खुलासा त्यांनी यावेळी केला.