शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद २०० रुग्णाच्या तपासण्या पूर्ण
इंदापूर(दि.९)* जनसामान्याच्या हितासाठी त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी व रोगाचे योग्य निदान करण्यासाठी इंदापूर येथे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या जन्मदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी (दि.९)डॉ. आंबेडकरनगर येथील सभागृहात इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर व क्रिटीकेर सेंटर इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम.के.इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदापूरचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सागर दोशी हे होते. यावेळी उपस्थित डॉक्टरांचा यथोचित सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी डॉ.संजय शहा,डॉ. उदय कुरुडकर, डॉ.मिलिंद खाडे, डॉ.कल्पना खाडे, डॉ. ऋषिकेश गार्डे,डॉ.विनोद राजपुरे आदी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांच्या इसीजी, रक्तातील साखर,बीपी, हाडांची तपासणी, स्त्रीयांची तपासणी आदी तपासण्या करून मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यावेळी स्त्रियांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड. राहुल मखरे यांनी प्रास्तविक केले. उपस्थित डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला दिला.
डॉ. एम. के. इनामदार यांनी मौलिक मार्गदर्शन करत दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरेंच्या आठवणीना उजाळा दिला.
तसेच दौंडचे आरोग्य विमा सल्लागार प्रभव काळे यांनी आरोग्य विम्याची गरज व त्याचे फायदे या संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी आनंद थोरात, गौतम कांबळे, तानाजी धोत्रे, बाबजी भोंग, माजी नगरसेविका व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) , नगरसेविका राजश्री मखरे, अशा चव्हाण, संतोष मखरे,संजय कांबळे, सुरज धाईंजे, ॲड.सुरज मखरे, ॲड. समीर मखरे,गोरख तिकोटे, राहुल शिंगाडे, महेश लोंढे, गणेश चंदनशिवे, अजय पारसे, मयूर मखरे, दया मखरे,रणजीत चंदनशिवे ,सतीश आढाव, अनिल खराडे, सुनील कांबळे, अण्णा गायकवाड, पत्रकार महेश स्वामी, शैलेश काटे, सिद्धार्थ मखरे, सागर शिंदे,शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी अल्पवतीतच नावारुपाला आलेल्या इंदापूर क्रिटीकेर सेंटरचे संचालक गोरख भोसले, शिक्षण संस्थेतील कर्मचारी, पक्षाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.