इंदापूर तालुक्यातील शहा – महादेवनगर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी दिलीप वामनराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शहा ग्रामपंचायत कार्यालयात आज बुधवार दि २५ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी दिलीप पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी औदुंबर शिंदे यांनी दिलीप पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी तलाठी के. देशमुख, ग्रामसेवक संजीवनी मराळ मॅडम व ग्रामपंचायतचे सर्व सत्ताधारी सदस्य उपस्थित होते.शहा महादेवनगर ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायत मध्ये कारभार केला जातो.सरपंच स्वाती पांढरे यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती, या ठिकाणी आज सरपंच पदाची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते, निवडीनंतर दिलीप पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला, गेली अनेक वर्षापासून शहा गावात पाटील कुटुंब यांचे वर्चस्व आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने वर्चस्व मिळवले होते.

यावेळी दिलीप पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पैनल प्रमुख, गावातील सर्व वरिष्ठ नेते मार्गदर्शक, ग्रामस्थ यांचे आभार मानले. यापुढे मंत्री दत्तात्रय भरणे, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली गावातील विकास कामे मार्गी लागतील असे मत व्यक्त केले, सर्वांना सोबत घेऊन काम करणार तसेच अडचणीच्या काळात पाटील परिवाराबरोबर कायम एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी साठी दिवस रात्र कायम सोबत राहील असे यावेळी ते म्हणाले.

यावेळी माजी सरपंच अशोक पाटील, दत्तात्रय बनसोडे, माजी सरपंच विष्णू पाटील, हरिदास इजगुडे, तंटामुक्ती अध्यक्ष धनाजी इजगुडे, माजी उपसरपंच नितीन इजगुडे, धनाजी देवकाते, लहू निकम, विठ्ठल पाटील, बलभीम गंगावणे, संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, संतोष कडवळे, सुरज धाईंजे, विजय पाटील, गणेश निकम, महादेव लांडगे, महादेव निकम, बाबा गंगावणे, हनुमंत निकम, बाबासाहेब पाटील, आबा गंगावणे, प्रकाश निकम, तात्यासाहेब जाधव, शिवाजी पाटील, उमेश पाटील, अनिल निकम, नवनाथ गंगावणे, आबा निकम, सचिन कोपनवर, ज्ञानदेव कोपनवर, रोहिदास इजगुडे, शिवाजी भोई, दादा भोई, उत्तम कोळी, बापू माने, दिलीप नगरे, शरद भोई, समाधान धाईंजे, रमेश बनसोडे, शुभम गंगावणे, राजू निकम, शिपाई दशरथ कडवळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
गेली साठ वर्षे शहा ग्रामपंचायतीवर पाटील परिवारांचे वर्चस्व कायम आहे, याच शहागावातून मंत्री दत्तात्रय भरणे यांना पाटील परिवारांच्या प्रयत्नातून विधानसभेत भरघोस असे मताधिक्य मिळाले आहे, यामुळे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाटील परिवारांना नक्कीच प्राधान्य देतील अशी चर्चा सर्वत्र केले जात आहे.