अकलूज, ता. माळशिरस येथील सयाजीराजे पार्क या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने पाचजण जखमी झाले व एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा अकलूज पंचक्रोशीत सुरू आहे. पाचजण कोण आहेत, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. सदरची माहिती घेऊन सविस्तर बातमी वृत्त हाती आल्यानंतर केली जाईल. सध्या अकलूज पंचक्रोशीत दबक्या आवाजात अपघाताची चर्चा सुरू आहे.